शुगर साठी काय औषध आहे?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 13:37

'हे' पाच घरगुती उपाय केल्यानं मधुमेह राहतो नियंत्रणात

खाण्याबाबत पथ्य पाळले नाही तर तुम्हाला मधूमेह होऊ शकतं. शरीरात अशक्तपणा जाणवतो, सतत डोकेदुखी होणे हे मधूमेहाचे लक्षण आहे.

भारतात मधुमेह रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१७ मध्ये सुमारे ७२ कोटीहून जास्त रुग्ण हे मधुमेहाचे असल्याचे समोर आले आहे. जर २०२५ पर्यंत अशीच अवस्था राहिली तर हा आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. १४ नोव्हेंबर ही तारीख वर्ल्ड डायबेटीज डे म्हणून ओळखला जातो. १९९१ पासून इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनने १४ नोव्हेंबरला मधुमेह दिन म्हणून ओळख दिली.

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत सारखे बदल होत राहतात. खाण्या-पिण्याची पथ्यं पाळली नाहीत तर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. सतत अशक्तपणा जाणवणं, चक्कर येणं, सतत डोकेदुखी होणं ही मधुमेहाची लक्षणं आहे. अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा हे पाच घरगुती उपाय.

१० मिलिलीटर आवळ्याचं ज्यूस आणि दोन ग्रॅम हळद पावडर एकत्रित करा. एकत्रित केलेलं मिश्रण दिवसातून दोन वेळा घेतल्यानं शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

मधुमेह कमी करण्यासाठी एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारल्याचं ज्यूस घ्या आणि ते एकत्र करून प्यावं. हे ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा. यामुळे मधुमेह कमी होते.

रोज जेवणानंतर बडीशोप खायची सवय अनेकांना असते. ही तशी चांगली सवय आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने रोज बडीशोप खावी. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मधुमेह असणाऱ्या माणसाला गोड पदार्थ खाण्यापासून अडवलं जातं. अनेकांना फळांचा आस्वाद घेता येत नाही. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने जांभूळ खाल्यानं त्यांचं शुगरचं प्रमाण कमी होतं.

टस्टिव्हिया नावाची वनस्पती मधूमेह असणाऱ्याला अतिशय फायद्याची आहे. सारखेपेक्षा जास्त गोडपणा या वनस्पतीमध्ये असतो. यामध्ये जरी जास्त गोडपणा असला तरी शरीरावर याचा काही फऱक पडत नाही. स्टिव्हिया वनस्पती शूगर फ्री वनस्पती म्हणून ओळखली जाते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info